8.
|
राज्याने मागील वर्षापासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आहे. त्यास शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्याच्यात महाराष्ट्रातील शिक्षक कमी दिसतात. शिक्षकांचा हा उत्साह पाहूनच राज्य शासनाने राज्यातील शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्याचा निर्णय दिनांक १४ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार घेतला आहे. राज्यातील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याची संधी या निमित्ताने आपणास मिळाली आहे. सुरुवातीस १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचे ठरविण्यात आले असून उत्साही, मेहनती, नित्य नवीन शिकणारे आणि समाजाचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळवणारे शिक्षक, ज्यांच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाळांच्या निवडीचे निकष पूर्ण करतात त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१७ असेल. संकल्पना पत्र (Concept Note), संबंधित शासन निर्णय व निवडीचे निकष विद्या प्राधिकरणाच्या www.maa.ac.in वर पाहता येईल.
टीप-
१. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थां मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळाच अर्ज करू शकतात.
२. आंतरराष्ट्रीय शाळांसाठी पूर्वी नोंदणी केलेल्या शाळांनी पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे.
|